शाहरुख खान वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा करणार, ग्रँड पार्टीचं आयोजन; मन्नतकडे चाहत्यांचे डोळे लागले

शाहरुख खान वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा करणार, ग्रँड पार्टीचं आयोजन; मन्नतकडे चाहत्यांचे डोळे लागले

बॉलिवडू अभिनेता शाहरुख खानचा येत्या 2  नोव्हेंबरला वाढदिवस आहे. शाहरुख खानचा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांना कोणत्याही सणापेक्षा कमी नाही. शाहरुखच्या वाढदिवशी त्याचे चाहते मध्यरात्रीपासूनच त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर जमायला लागतात. त्याच्या चाहत्यांची दरवर्षी ‘मन्नत’ बंगल्याच्याबाहेर मोठी गर्दी जमते. शाहरुखचा 59 वा वाढदिवस यावर्षी प्रचंड धुमधडाक्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा वाढदिवस यावेळी स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट केला जाणार आहे. शाहरुख फिल्म इंडस्ट्रीमधील जवळचे मित्र आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुखच्या वाढदिवसासाठी ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आली आहे. शाहरुखच्या टीमने आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी मिळून त्याच्या वाढदिवसासाठील कुणाला निमंत्रितद करायचं यासाठी निमंत्रण पत्रिका आणि गेस्ट लिस्टसाठी खूप मेहनत घेतल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या ग्रँड सेलिब्रेशन पार्टीसाठी जवळपास 250 पेक्षा जास्त जणांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.

गेस्ट लिस्टमध्ये कोण-कोण असणार?

शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या ग्रँड पार्टीत कोण-कोण असणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता असणे साहजिकच आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीला रणवीस सिंह, सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, एटली, जोया अख्तर, फराह खान, शनाया कपूर, महीप कपूर, शालिनी पस्सी, नीलम कोठारी, करण जौहर, अनन्या पांडे, आलिया भट्ट, शाहीन भट्ट यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक तारका उपस्थित असणार आहेत. शाहरुख आणि गौरीचे जवळचे मित्रदेखील पार्टीत काहीतरी मजेशीर गोष्टी करुन कार्यक्रमाची शोभा वाढवणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख या दिवशी आपले कुटुंब, सासू यांच्यासह इंटीमेट डिनर करणार आहे.

शाहरुख पार्टीत मोठी घोषणा करणार?

शाहरुख खानच्या वाढदिवशी ग्रँड पार्टीसोबतच आणखी एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख आपल्या वाढदिवसाच्या या स्पेशल दिवशी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या चित्रपट शाहरुख त्याची मुलगी सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. याचाच अर्थ बाप-बेटी एकाच चित्रपटात बघायला मिळणार आहेत. त्यामुळे किंग खानच्या वाढदिवसी त्याच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळणार आहे. शाहरुखचे मुलं आर्यन खान आणि सुहाना सध्या कामासाठी दुबईत आहेत. ते दिवाळीत वडिलांच्या वाढदिवसासाठी मुंबईत येणार आहेत.

शाहरुखच्या वाढदिवशी तो त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांचेदेखील आभार मानतो. त्याचे चाहते दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला ‘मन्नत’ बंगल्याबाहेर शेकडोंच्या संख्यने गर्दी करतात. त्यावेळी शाहरुख हा देखील त्याच्या चाहत्यांमध्ये जातो. चाहत्यांच्याकडून मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करत असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;