“एकतर तुम्ही खोटं बोलताय नाहीतर तुमचे…”, देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवारांचा हल्लाबोल

“एकतर तुम्ही खोटं बोलताय नाहीतर तुमचे…”, देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवलेल्या टाटा एअर बस प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये एक विधान केले. हा प्रकल्प महायुतीचे सरकार येण्याआधीच गुजरातला गेल्याचा दावा फडणवीस यांनी केला. मात्र हा दावा खोटा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला असून उद्योगमंत्री उदय सामंत यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. “टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याचे कोणी सांगितले होते? तर हे आपल्याच उद्योगमंत्र्यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी सांगितले होते. याचा अर्थ तेव्हापर्यंत हा प्रकल्प गुजरातला गेला नव्हता हे स्पष्ट आहे. तुमच्या म्हणण्यानुसार टाटा एअरबस गुजरातला आधीच गेला होता तर मग उद्योगमंत्री उदय सामंत हे महाराष्ट्राशी खोटे बोलले का? एकतर तुम्ही खोटे बोलत आहात नाहीतर तुमचे मंत्री खोटे बोलत आहेत”, असे रोहित पवार यांनी नमूद केले.

खोटे पण रेटून बोलण्याची तुमची जुनी सवय महाराष्ट्राला चांगलीच ठाऊक आहे. कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषण तुम्ही केली पण तुमच्या लाडक्या मित्राला दलालीचा प्रसाद मिळावा म्हणून तुम्ही कंत्राटी भरती पुन्हा सुरु केली, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो म्हणून तुम्ही आश्वासन दिले, त्यानंतर तुम्ही 750 कॅबिनेट घेतल्या पण निर्णय घेतला नाही. राहिला प्रश्न वेदांत FOXCONN आणि राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा तर त्यासंदर्भात लवकर तुमचा खोटारडेपणा सविस्तरपणे जनतेसमोर आणेल, तयार रहा, असे आव्हानही रोहित पवार यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;