‘ही तर अश्लीलता..’; दिवाळी पार्टीत अवनीत कौरचा बोल्ड अंदाज पाहून भडकले नेटकरी

‘ही तर अश्लीलता..’; दिवाळी पार्टीत अवनीत कौरचा बोल्ड अंदाज पाहून भडकले नेटकरी

बालकलाकार ते बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री अवनीत कौर सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग असून तिने नुकतेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या इंडस्ट्रीत दिवाळी पार्ट्यांची धूम पहायला मिळतेय. अशाच एका दिवाळी पार्टीत अवनीतने अत्यंत ग्लॅमरस अंदाजात एण्ट्री केली. मात्र यावेळी तिने परिधान केलेले कपडे नेटकऱ्यांना फारसे रुचले नाहीत. या कपड्यांवरून अवनीतला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. दिवाळी पार्टील अवनीतने निळ्या रंगाचा साडी-स्टाइल आऊटफिट परिधान केला होता. ब्रालेट स्टाइल ब्लाऊज आणि हाय स्लीट स्कर्ट असा अवनीतचा बोल्ड अंदाज पहायला मिळाला. रेड कार्पेटवर तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

दिवाळी पार्टीतील इतका बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘हे अश्लील वाटतंय, दिवाळी पार्टीत असे कपडे कोण घालतं’, असं एकाने लिहिलंय. तर ‘अंगप्रदर्शन करणे म्हणजे फॅशन नव्हे’ असा टोला दुसऱ्या युजरने लगावला आहे. ‘सेक्सी दिसण्याच्या नादात ही आणखी वाईट दिसतेय’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अवनीतने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘अलादिन- नाम तो सुना होगा’ आणि ‘चंद्रनंदिनी’ यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. अवनीत तिच्या डान्समुळेही विशेष ओळखली जाते. अभिनेत्री अवनीत कौर अवघ्या 23 व्या वर्षी सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. वयाच्या 23 व्या वर्षी अवनीतची एकूण संपत्ती जवळपास 11 कोटी रुपयांच्या घरात आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 32 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अवनीत कौर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील दोघांचा किसिंग सीन खूप व्हायरल झाला होता. इतकंच नव्हे तर त्यावरूनही अवनीतला ट्रोल करण्यात आलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;