पोलीस ठाण्यासाठी वापरला फुकटचा एसी, एलईडी, हायकोर्टाने महासंचालकांना दिले चौकशीचे आदेश

पोलीस ठाण्यासाठी वापरला फुकटचा एसी, एलईडी, हायकोर्टाने महासंचालकांना दिले चौकशीचे आदेश

ठाणे येथील कासारवडवली पोलिसांनी एसी, एलईडी, वॉटर कुलर, प्रिंटर व अन्य काही वस्तू पोलीस ठाण्यासाठी घेतल्या व वापरल्याही, पण त्याचे पैसेच दिले नाहीत. या वस्तू पोलिसांना देणाऱ्याने याची ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

एवढय़ा महागडय़ा वस्तू पोलिसांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता घेतल्याच कशा? या आरोपात तथ्यता असेल तर ते गंभीर आहे. याची तक्रार करण्यात आली आहे. त्याची चौकशी व्हायलाच हवी. पोलीस महासंचालक यांनी या चौकशीसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी. या अधिकाऱ्याने तीन महिन्यांत ही चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्या. सारंग कोतवाल व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने दिले. यावरील पुढील सुनावणी फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे.

काय आहे प्रकरण

नैनेश पांचाळविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवण्यात आली होती. तक्रारदाराकडून त्याने 4.24 लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्या व त्याचे पैसेच दिले नाहीत, असा आरोप होता. नंतर पांचाळने पावणेचार लाख रुपये तक्रारदाराला दिले व हा वाद मिटला. वाद मिटल्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी पांचाळने याचिका केली. यास तक्रारदाराने संमती दिली. त्यानुसार खंडपीठाने पांचाळविरोधातील गुन्हा रद्द केला.

अशी उघडकीस आली पोलिसांची करामत

तक्रारदाराला पैसे देण्यास उशीर का झाला, अशी विचारणा न्यायालयाने पांचाळला केली. मी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू कासारवडवली पोलीस ठाण्याला व तेथील अधिकाऱयांना दिल्या होत्या. त्याचे पैसे मला मिळाले नाहीत. ठाणे पोलीस आयुक्तांकडे याची तक्रार केली. या तक्रारीतून काहीच निष्पन्न झाले नाही. मग त्या वस्तू मला परत करण्यात आल्या. यात माझे खूप नुकसान झाले. याच कारणामुळे तक्रारदाराचे पैसे देण्यास उशीर झाला, असे पांचाळने खंडपीठाला सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने याच्या चौकशीचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;