वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव वेगातील वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे येथे घडली. तरबेज कुरेशी असे मृताचे नाव आहे. त्याचा मित्र नौशाद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

नौशाद हा वांद्रे बेहरामनगर येथे राहतो. तो डिलिव्हरी बॉयचे काम करतो. तरबेज हा नौशादचा मित्र आहे. शनिवारी रात्री ते दोघे त्याच्या मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात होते. नौशाद हा मोटारसायकल चालवत होता, तर तरबेज हा मागे बसला होता. ते पश्चिम द्रुतगती महामार्ग येथून माहीमच्या दिशेने जात होते. तेव्हा भरधाव वेगातील वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. त्या धडकेने त्यांची मोटारसायकल स्लिप झाली. त्यामुळे ते दोघे खाली पडले. तरबेजच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती समजताच वांद्रे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तरबेजला तपासून मृत घोषित केले, तर नौशादवर उपचार सुरू  आहेत. नौशादने दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;