तेच डोळे, तोच चेहरा, तेच हास्य.. हुबेहूब करिश्मा कपूर सारखी दिसते ‘ही’ तरुणी, व्हिडीओ व्हायरल

तेच डोळे, तोच चेहरा, तेच हास्य.. हुबेहूब करिश्मा कपूर सारखी दिसते ‘ही’ तरुणी, व्हिडीओ व्हायरल

Karisma Kapoor: अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 90 व्या दशकात फक्त बॉलिवूडवर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण करिश्मा कपूर हुबेहूब तिच्यासारख्या दिसणाऱ्या एका तरुणीमुळे चर्चेत आली आहे. करिश्मा कपूर हिची एक चाहती आहे, जी हुबेहूब अभिनेत्री सारखी दिसते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. करिश्माच्या चाहतीला पाहिल्यानंतर अनेकांना विश्वास देखील बसणार नाही.

हुबेहूब करिश्मा सारख्या दिसणाऱ्या तरुणीचं नाव हिना असं आहे. हिना करिश्मा फार मोठी चाहती आहे. हिना कायम करिश्माच्या सिनेमांमधील लूक कॉपी करत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. हिनाच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर 12 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहे.

व्हिडीओ नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘डोळे हुबेहूब करिश्मा सारखीच आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘वाह, लोलो…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही हुबेहूब करिश्मा सारखी दिसते…’ हिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर हिना हिने 273K फॉलोअर्स आहेत. तर हिना फक्त 168 जणांना फॉलो करते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Henna (@hennaakh1)

 

करिश्मा कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’, ‘राजा बाबू’, ‘मर्डर मुबारक’, ‘जीत’, ‘हम साथ साथ है’, ‘हिरे नं 1’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. करिश्मा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. करिश्मा हिने घटस्फोटानंतर कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्रीने सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ केला.

उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. अभिनेत्रीने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. करिश्मा हिने पती आणि सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. आता करिश्मा दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;