सोहैल खानला घटस्फोट दिल्यानंतर मुलांना नेमकं काय हवंय? सीमाकडून खुलासा

सोहैल खानला घटस्फोट दिल्यानंतर मुलांना नेमकं काय हवंय? सीमाकडून खुलासा

सलमान खानचा भाऊ, अभिनेता सोहैल खान याने लग्नाच्या 24 वर्षांनंतर पत्नी सीमा सजदेहला घटस्फोट दिला. सोहैल आणि सीमाला दोन मुलं आहेत. ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील शोमध्ये सीमा तिच्या घटस्फोटाविषयी आणि त्याचा मुलांवर झालेल्या परिणामाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटानंतर सीमा वांद्रे इथून लोअर परळला राहायला गेली. यामुळे निर्वाण आणि योहान ही तिची मुलं तिला भेटायला फार कमी येऊ लागल्याची खंत सीमाने बोलून दाखवली. वांद्रे इथंच मुलांना घरासारखं वाटू लागल्याने ती लोअर परळला फार क्वचित सीमाला भेटायला जायची.

“मला दोन मुलं आहेत आणि त्या दोघांमध्ये 11 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे आमच्या घटस्फोटानंतर त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, याचं स्पष्टीकरण कोणतंच ठराविक वय देऊ शकत नाही. आमच्या तुलनेत ते एका अशा जगात वावरत आहेत, जिथे त्यांना प्रचंड माहिती सतत मिळतेय. कधी कधी ही माहिती गरजेपेक्षा जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचते. आमची मुलं सुजाण आणि हुशार आहेत. त्यामुळे त्यांच्यात अधिक आत्मविश्वास आहे. आमच्या काळात हे सर्व शक्य झालं नसतं”, असं सीमा म्हणाली.

एका एपिसोडमध्ये सीमाचा मोठा मुलगा निर्वाणने सांगितलं की त्याचा छोटा भाऊ योहान हा एके दिवसी ‘घटस्फोट’ या शब्दाचा अर्थ इंटरनेटवर शोधत होता. कारण योहान त्यावेळी खूप लहान होता आणि त्याला घटस्फोट म्हणजे काय, हे सुद्धा माहीत नव्हतं. याबद्दल सीमा म्हणाली, “तो सध्या ठीक आहे. वयातील अंतरामुळे निर्वाण आणि योहान यांच्या स्वभावात फार फरक आहे. निर्वाण त्याची प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करतो. जेव्हा त्याची पहिली गर्लफ्रेंड होती, तेव्हा सर्वांत आधी त्याने मला फोन करून सांगितलं होतं. तुझ्याशी भेटायला मी तिला घरी आणू शकतो का?, असं त्याने मला विचारलं होतं. माझ्यासाठी निर्वाण असाच आहे. तो खूप वेगळा आहे. योहान तसा नाहीये.”

सीमा आणि सोहैल यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. घटस्फोटाआधी दोघं वेगवेगळे राहू लागले होते. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर सीमाला हळूहळू या गोष्टीची जाणीव होऊ लागली की मुलांना पालकांकडून काय हवं असतं. याविषयी ती पुढे म्हणाली, “आता घटस्फोटाच्या दोन वर्षानंतर मी हे समजू शकतेय की मुलांना काय हवं असतं? आपले दोन्ही पालक सोबत राहावेत, एवढीच माफक अपेक्षा त्यांची असते. हे सर्वांत महत्त्वाचं आहे आणि दोघांनी एकमेकांसोबत खुश राहावं, असं त्यांना वाटतं. मुलांसाठीही ही गोष्ट चांगली असते. त्यांना कुठेही अडकू नये असं वाटतं.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;