शिवा, लीला, सूर्या आणि वसुची लग्नानंतरची पहिली दिवाळी; मालिकांमध्ये रंजक ट्विस्ट
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत यंदाची दिवाळी सूर्या आणि तुळजासाठी प्रेममयी असणार आहे. डॅडी सूर्याला घरी बोलावतात. सगळे तणावात आहेत की डॅडींनी अचानक सगळ्यांना का बोलावलं असेल? दुसरीकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. बहिणी सूर्याला दिवाळीसाठी काय काय हवं सांगतात. सूर्या सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट आणतो. पण स्वतःसाठी काहीच आणत नाहीत. हे बघून बहिणी भावूक होतात.
'शिवा' मालिकेत शिवा आणि आशू एकत्र चार्टर्ड प्लेनमधून प्रवास करतात. तिथेच शिवाने आशूसाठी प्रपोजलचा प्लॅन केलाय. शिवाची ही अनपेक्षित कृती पाहून आशु थक्क होतो. मात्र इतक्यात आशूला फॅक्ट्रीमधून फोन येतो की कामगारांना दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे ते संप पुकारतात. यामुळे शिवा आणि आशु यांना मुंबईला परतावं लागतं.
'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये पार्टीच्या वेळी लकी वसूला सांगतो की आज रात्री तिला त्याच्या बेडरूममध्ये यायचं आहे. वसु त्याच्या खोलीत जाणार, पण लकीला धडा शिकवायला. याचा राग येऊन लकी वसूला सांगतो की ही दिवाळी ठाकूर कुटुंबासाठी नरक असेल. वसुही लकीला आव्हान देते की एका आठवड्यात तू घराबाहेर असशील.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत सरोजिनी लीलाला एजे आणि अंतरा यांच्या कॉलेजच्या दिवसांची गोष्ट सांगते, की एजेने कॉलेजमध्ये अंतराला कसं प्रपोज केलं होतं? सरोजिनीच्या गोष्टीने लीला भारावून जाते. आता लीला सासू म्हणून पुन्हा घरात येणार आहे. लीला 2.0 आल्यामुळे दिवाळीत सुनांची कशी तारांबळ उडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, एजे लीलाचं मन जिंकण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आणि स्वतःहून तिच्या गळ्यात मंगळसूत्र परत घालणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List