“होय, आम्ही वेगळे झालोय…”; सई ताम्हणकरने दिली ब्रेकअपची कबुली

“होय, आम्ही वेगळे झालोय…”; सई ताम्हणकरने दिली ब्रेकअपची कबुली

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सईने सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. ‘मी पर्यायाने सिंगल आहे. हा माझा पर्याय नाही पण तरीही हा एक पर्याय आहे’, अशी तिची पोस्ट होती. या पोस्टनंतर सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून निर्माता अनिश जोगसोबतचे फोटो डिलिट केले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सईने तिच्या ब्रेकअपचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे ब्रेकअपचा हा निर्णय परस्परसंमतीने घेतल्याचंही तिने स्पष्ट केलंय.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, “होय, आमचे मार्ग वेगळे झाले आहेत आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय खूप कठीण होता पण अखेर तो घ्यावा लागला. आता जे आहे ते आहे. माझ्या आयुष्यातील तो खूप खास व्यक्ती आहे आणि नेहमीच राहील. मी कायमच त्याच्या चांगल्यासाठी प्रार्थना करेन आणि त्यालाही माझ्याबद्दल हेच वाटतं हे मला माहीत आहे.” सई ही निर्माता अनिश जोगला डेट करत होती. त्याच्यासोबतचे फोटोसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

अनिशला डेट करण्यापूर्वी सईने व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. या दोघांनी 2013 मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच ते विभक्त झाले. अनिशने सईच्या बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली होती. तेव्हापासून दोघं एकमेकांना चांगले ओळखतात. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. वायझेड (2016), गर्लफ्रेंड (2019) आणि धुरळा (2020) या चित्रपटांची निर्मिती अनिशने केली आहे. मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या लग्नात सई आणि अनिश एकत्र दिसले होते.

“माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यादरम्यान मर्यादेची एक सीमा आहे आणि मी त्या सीमेबद्दल मी जागरूक असते”, असं सई पुढे म्हणाली. सई तिच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी व्यक्त होत नाही. मात्र अनिशसोबतच्या ब्रेकअपबद्दल तिने स्वत:हून खुलासा केल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे. सई लवकरच ‘ग्राऊंड झिरो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती इमरान हाश्मीसोबत भूमिका साकारणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;