नीना कुळकर्णी यांच्या निधनाची अफवा, ‘मी जिवंत…’ असं सांगत म्हणाल्या…

नीना कुळकर्णी यांच्या निधनाची अफवा, ‘मी जिवंत…’ असं सांगत म्हणाल्या…

Neena Kulkarni Death Rumours: झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींच्या चर्चा कायम सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. पण काही चर्चा अशा देखील असतात ज्यामुळे सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसतो. नुकताच काजोल हिने स्वतःच्या निधनाच्या अफवांबद्दल सांगितलं होतं. आता अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी देखील निधनाच्या अफवांचं खंडन करत सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सोशल मीडियावर नीना कुळकर्णी यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

निधनाच्या अफवांचं खंडन करत नीना कुळकर्णी म्हणाल्या, ‘माझ्या निधनाची यूट्यूबवर पसरत असलेली बातमी खोटी आहे. मी जिवंत आहे आणि स्वस्थ आहे. देवाच्या कृपाने कामात व्यस्त आहे. अशा बातम्यांना कृपया प्रोत्साहन देऊ नका.. त्याकडे दुर्लक्ष करा… मला दीर्घायुष्य मिळो…’ असं नीना कुळकर्णी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

नीना कुळकर्णी यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. वयाच्या 69 व्या वर्षी देखील नीना कुळकर्णी अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द सिग्नेचर’ सिनेमात त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत त्या सक्रिय आहेत. सोशल मीडियावर देखील नीना कुळकर्णी कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

‘बायोस्कोप’ , ‘मोगरा फुलला’ , ‘बादल’, ‘नायक’, ‘हंगामा, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ अशा अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.

नीना कुळकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतता. इन्स्टाग्रामवर नीना कुळकर्णी यांचे 217K फॉलोअर्स आहेत. तर त्या फक्त 428 नेटकऱ्यांना फॉलो करतात. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नीना कुळकर्णी कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;