भाजपने दिला चार विद्यमान आमदारांना नारळ, फडणवीसांचे पीए वानखेडेंना उमेदवारी

भाजपने दिला चार विद्यमान आमदारांना नारळ, फडणवीसांचे पीए वानखेडेंना उमेदवारी

भाजपने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदार सुनील राणे, दादाराव केचे, विकास कुंभारे आणि डॉ. संदीप धुर्वे या चार आमदारांना नारळ दिला आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना  आर्वीमधून उमेदवारी दिली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने डॉ. संतूक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

बोरिवलीतील विद्यमान आमदार सुनील राणे यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या जागी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे; पण संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीला गोपाळ शेट्टी यांनी विरोध केला आहे. घाटकोपर पूर्वमधून माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी उमेदवारी मागितली होती; पण त्यांची मागणी फेटाळून आमदार पराग शहा यांना पुन्हा उमेदवारी दिली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधाला न जुमानता  अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिली. यवतमाळच्या अर्णीतून डॉ. संदीप धुर्वे यांना तिकीट नाकारून माजी आमदार राजू तोडसाम यांना तर नागपूर मध्य मतदारसंघातून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी नाकारून येथे प्रवीण दटके यांना संधी देण्यात आली आहे.

फडणवीसांचे पीए व्हा, आमदारकी मिळवा

2019च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी आपले तत्कालीन पीए अभिमन्यू पवार यांना लातूर जिह्यातील औसामधून उमेदवारी देऊन निवडून आणले होते. आता पीए सुमित वानखेडे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे फडणवीस यांचे पीए बना आणि विधानसभेचे तिकीट घ्या, अशी चर्चा सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;