कोपरी-पाचपाखाडीत मशाल तळपली, दणदणीत रॅली; केदार दिघे यांचा अर्ज दाखल

कोपरी-पाचपाखाडीत मशाल तळपली, दणदणीत रॅली; केदार दिघे यांचा अर्ज दाखल

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात आज शिवसेना महाविकास आघाडीची दणदणीत रॅली निघाली. यानिमित्ताने मशाल तळपली असून रॅलीमध्ये  शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनी प्रचंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केदार दिघे यांची लढत होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

रघुनाथनगर येथील शिवसेना शाखेपासून आज सकाळी भव्य रॅलीला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कोपरी-पाचपाखाडीमधील असंख्य नागरिकही त्यात सहभागी झाले होते. भगवे झेंडे व हातात मशाल घेतलेले शिवसैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना नेते व ठाणे मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, माजी नगरसेवक संजय तरे, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, विभागप्रमुख प्रकाश पायरे, संजय ब्रीद, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, सुरेश मोहिते, विश्वास निकम आदी सहभागी झाले होते.

मिंध्यांनी आचारसंहिता पायदळी तुडवली

उमेदवारी अर्ज भरताना केवळ पाच जणांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जातो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्ज भरण्यासाठी आले असताना त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आत शिरले. आचारसंहिता पायदळी तुडवली गेल्याने मिंध्यांवर कारवाई होणार का, असा थेट सवाल मतदारांनी केला आहे.

ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावान

ठाणेकर जनता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर नितांत प्रेम करणारी आहे. ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावान अशी असून कोपरी-पाचपाखाडीमध्ये गेल्या वीस वर्षांपासून जनतेचे अनेक प्रश्न तसेच पडून आहेत. रस्त्यांवर पडलेले खड्डे, ट्रफिक जाम, महिलांवरील अत्याचार अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असून या निवडणुकीत मतदार गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. – केदार दिघे (शिवसेना उमेदवार)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;