उद्धव ठाकरे या देव माणसाची माफी मागायची आहे, मी चुकलो; श्रीनिवास वनगा धायमोकलून रडले
ज्यांनी राजकारणात मोठं केलं त्या उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करून मिंधेसोबत सुरतला पळालेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे येत्या विधानसभा निवडणूकीत मिंध्यांनी तिकीट कापले आहे. तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा हे निराश झाले असून त्यांनी मीडियासोबत बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागायची असल्याचे सांगितले आहे.
”उद्धवजींसारख्या देव माणसामुळे मी आमदार झालो पण मिंधे सारख्या घातकी माणसांसोबत गेलो आणि माझा घात झाला. त्यांनी प्लॅनिंग करून माझं तिकीट कापलं आहे. त्यांना प्रामाणिक व्यक्ती नकोयत, चोरी लबाडी करणारी लोकं हवी आहेत”, अशा शब्दात वनगा यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांची माफी मागायची आहे – श्रीनिवास वनगा
”मी चुकलो आहे आणि त्यासाठी मला उद्धव ठाकरे या देव माणसाची माफी मागायची आहे, असे वनगा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी ते धायमोकलून रडत होते.
उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव माणूस – सुमन वनगा
”उद्धवसाहेब आमच्यासाठी देव होते. एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला ही आमची चूक झाली, असे श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List