हैदराबादमध्ये मोमोज खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू, 50 जण आजारी

हैदराबादमध्ये मोमोज खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू, 50 जण आजारी

मोमोज खाल्ल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. तर अन्य 50 जण आजारी पडले आहेत. रेश्मा बेगम असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोमोज विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

हैदराबाद येथील बंजारा हिल्समधील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर रेश्मा बेगम, तिची मुले आणि सिंगाडाकुंटा बस्तीच्या इतर अनेक लोकांनी शुक्रवारी मोमोज खाल्ले. मोमोज खाल्ल्यानंतर शनिवारी सर्वांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. यानंतर सर्वांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान रेश्मा बेगम हिची प्रकृती खालावल्याने तिला निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (NIMS) येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मोमोजमधील मेयोनिज आणि चटणीमुळे विषबाधा झाल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी सखोल तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;