कॅनडात टेस्ला कार अपघातात चार भारतीयांचा मृत्यू, एक जण जखमी
कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात एका रस्ते अपघातात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. टोरंटोच्या डाउनटाउनमधील लेक शोर बुलेवर्ड ईस्ट आणि चेरी स्ट्रीट परिसरात हा अपघात झाल्याचे पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
टोरंटोमध्ये 25-30 वयोगटातील पाच जण टेस्ला कारने प्रवास करत होते. यादरम्यान चेरी स्ट्रीट परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार सिमेंटच्या खांबावर आदळून अपघात घडला.
अपघातात कारमधील चार भारतीय नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील एक महिला जखमी झाली. एका प्रवाशाने महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलीस पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List