धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कायम मातोश्रीच्या पाठिशी – कैलास पाटील

धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कायम मातोश्रीच्या पाठिशी – कैलास पाटील

धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी आज भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कायम मातोश्रीच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी यावेळी दिली.

पन्नास खोके तसेच मंत्रीपदावर लाथ मारुन मातोश्री, जनतेशी एकनिष्ठ असलेले निष्ठावंत आमदार कैलास घाडगे – पाटील यांना शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने दुसर्‍यांदा संधी देण्यात आली आहे. आज सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करत आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. ही रॅली अण्णाभाऊ साठे चौक, धारासूर मर्दिनी मंदिर, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा, नेहरू चौक काळा मारुती मंदिर, संत गाडगे बाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसिल कार्यालया बाहेर आली. त्यानंतर आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे यांच्यासह काँग्रेसचे जेष्ठ नेते विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना बंडखोरी, फाटाफूट नवीन नाही. धाराशिव – कळंब मतदारसंघातील शिवसैनिक हा कायम मोतोश्री आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहणार्‍याच्या पाठिशी राहतो. २३ तारखेला विजयावर शिक्का मोर्तब होईल. माझ्या विरोधात विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. यावरुच मतदारसंघातील परिस्थिती लक्षात येते. या निवडणूकीत देखील ठाकरे सरकारच्या काळात केलेली विकासकामे हाच निवडणूकीतील प्रचाराचा मुद्दा असल्याचे कैलास पाटील यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;