दिवाळीला ऑनलाईन सफाई कामगार बोलावणे महागात पडले, लाखोंचे सोने चोरले

दिवाळीला ऑनलाईन सफाई कामगार बोलावणे महागात पडले, लाखोंचे सोने चोरले

दिवाळीला ऑनलाईन सफाई कामगार बोलावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सफाईसाठी आलेल्या दोघा कामगारांनी महिलेच्या घरातील लाखोंचे सोने लुटून पलायन केले. मुंबईतील दहिसर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

दहिसरमधील ऋषिकेश सोसायटीत राहणाऱ्या दिपाली म्हात्रे या महिलेने NoBroker अ‍ॅपच्या माध्यमातून 21 ऑक्टोबर रोजी क्लिनिंग सर्विस बुक केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दोन तरुण त्यांच्या घरी आले. दोघांनी घरची साफसफाई केली आणि निघून गेले.

काही वेळाने म्हात्रे यांनी आपल्या घरातील तिजोरी उघडी असल्याचे पाहिले. त्यांनी तिजोरीत पाहिले असता चार लाख रुपयांचे सोने गायब होते. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंदवली. यानंतर पोलिसांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तापसले.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोघा आरोपींची ओळख पटवली. संतोष ओमप्रकाश यादव आणि सुफियान नजीर अहमद सौदार अशी दोघा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सुरूवातीच्या तपासाच्या आधारे मुख्य संशयित आरोपी आरबाज खान नामक तरुणाला अटक केली. NoBroker अ‍ॅने आपल्या कर्मचाऱ्यांच्या बॅकग्राऊंडबाबत व्हेरिफिकेशन केले होते का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;