Maharashtra Election 2024 – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर, 7 उमेदवारांची घोषणा

Maharashtra Election 2024 – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर, 7 उमेदवारांची घोषणा

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीची चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 7 उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काटोल मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत X हॅंडलवर ही यादी पोस्ट करण्यात आली आहे. या यादीत 7 विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. माण,काटोल, खानापूर,वाई, दौंड, पुसद, सिंदखेडा, या मतदारसंघांचा समावेश आहे. माण मधून प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कटोलमधून सलील देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. खानापूरमधून वैभव सदाशिव पाटील, वाईमधून अरुणादेवी पिसाळ, दौंडमधून रमेश थोरात, पुसदमधून शरद मैंद तर सिंदखेडामधून संदीप बेडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एकूण 83 उमेदवारांची नावे जाहीर –

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 3 याद्या जाहीर केल्या आहेत. पहिली यादी 45 उमेदवारांची, दुसरी 22 उमेदवारांची तर तिसरी यादी 9 उमेदवारांची असून आता चौथी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकूण 83 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

90 चा फॉर्म्युला 

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष प्रत्येकी 85 ऐवजी 90 जागांवर लढणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. जागावाटपात इतर घटक पक्षांनाही मानाचे स्थान देण्यात आले असून उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना सोडण्याचे निश्चित झाले आहे, असे थोरात यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;