भाजपच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’ ; भाजप सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय – नाना पटोले

भाजपच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’ ; भाजप सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय – नाना पटोले

भाजप सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजप व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प व नोकऱ्या हिरावणाऱ्या महाराष्ट्रद्रोही भारतीय जनता पक्ष युतीला विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

टाटा एअरबस प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये उद्घाटन केले, त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते, ते पुढे म्हणाले की, टाटा एअरबस या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती तसेच या प्रकल्पामुळे 10 हजार रोजगार उपलब्ध होणार होते पण हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही. भाजपचे केंद्रातील सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेमुळे हा मोठा प्रकल्प गुजरातला पळवला. वेदांता फॉक्सकॉन हा 1.50 लाख कोटी रुपयांचा प्रकल्पही याच महाराष्ट्रद्रोही लोकांनी महाराष्ट्रात होऊ दिला नाही. भाजप युती सरकार नोकर भरती करत नाही आणि ज्या प्रकल्पामुळे राज्यातील तरुण मुलामुलींना रोजगार मिळणार होते तो प्रकल्पही गुजरातला पळवला आहे.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले नाहीत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतात, त्या फडणवीसांनी टाटा एअरबस प्रकल्पाचे गुजरातमध्ये उद्घाटन झाले आहे हे डोळे उघडे करुन पहावे व महाराष्ट्राला चुकीची माहिती देऊ नये. राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारमुळेच महाराष्ट्राची प्रगती खुंटली असून राज्य पिछाडीवर गेले आहे. ‘मोदीजी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार’ अशा थापा मात्र आता शिंदे फडणवीसांनी मारू नयेत, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;