30 वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘करण-अर्जून’ मोठ्या पडद्यावर; सलमान खानच्या पोस्टची चर्चा
On
‘रहना है तेरे दिल में’, ‘तुंबाड’, हे चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येऊन गेले होते. म्हणजेच हे चित्रपट नुकतेच री-रिलीज झाले होते. हे चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची इच्छआ प्रेक्षकांची नक्कीच होती. री-रिलीज होऊनसुद्धा प्रेक्षकांचा मात्र नव्यासारखाच प्रतिसाद पाहायला मिळाला होता. आता प्रेक्षकांची अजून एक इच्छा पूर्ण होणार आहे ती म्हणजे अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खानला एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची. पण या दोन्ही मित्रांचा कोणता नवीन चित्रपट येत नाहीये तर त्यांचा हिट झालेलाच एक चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Karan Arjun re-release
शाहरुख खान आणि सलमान खान यांचा गाजलेला चित्रपट ‘करण अर्जुन’ अनेकांना थिएटरमध्ये पाहता आला नाही आता मात्र तो पाहाता येणार आहे. कारण ‘करण अर्जुन’ तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘करण अर्जुन’चे दिग्दर्शक राकेश रोशन यांचा हा चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. सलमान खाननं त्याच्या चाहत्यांना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘भाईजान’नं या पोस्टमध्ये लिहिलं, ‘राखीजीने चित्रपटात अगदी बरोबर सांगितलं होतं की, माझे करण अर्जुन नक्की येतील… 22 नोव्हेंबरला जगभरातील चित्रपटगृहात.’ ही पोस्ट पाहाताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
90 च्या दशकातील आइकॉनिक चित्रपट
‘करण अर्जुन’ हा चित्रपट 90 च्या दशकातील आइकॉनिक चित्रपट मानला जातो. एवढचं नाही तर या चित्रपटातील डायलॉगही तेवढेच हीट ठरले, त्यातील गाजलेला डायलॉग म्हणजे “मेरे करण अर्जून आयेंगे”. या चित्रपटात तगडे कलाकार तर होतेच शिवाय गाणेही सुपर-डूपर ठरले. आणि त्या गाण्यांची क्रेझ आजही आहे. हा चित्रपट जुन्या पिढीसह नव्या पिढीलासुद्धा थिएटरमध्ये जाऊन पाहाता येणार आहे. हे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल.
‘करण अर्जुन’च्या कहाणीबद्दल…
‘करण अर्जुन’च्या कहाणीबद्दल सांगायचे झाले तर अतिशय हृदयस्पर्शी, भावनिक आणि त्याकाळातील तो एक अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खाननं अर्जुनची तर सलमान खाननं करणची भूमिका साकारली होती. याशिवाय राखीनं चित्रपटात करण-अर्जुनच्या आईची उत्तम भूमिका साकारली. ‘करण अर्जुन’ चित्रपटात दिवंगत अभिनेता अमरीश पुरीनं ठाकूर दुर्जन सिंग नावाच्या खलनायकाची भूमिका केली होती. चित्रपटातील दोन भावांचा पुनर्जन्म होतो आणि ते त्यांच्या खुनाचा बदला घेतात अशी ती एक रंजक कहाणी आहे.

Karan Arjun re-release
‘करण अर्जुन’च्या रि-रिलीजची पोस्ट पाहताच प्रेक्षकांचे कमेंट पाहून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळणार असं दिसत आहे.या निमित्ताने तरी सलमान आणि शाहरूख खानला पुन्हा एकदा एकत्रपणे एकाच चित्रपटात आणि तेही मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List