Maharashtra election 2024 – विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल; विजयाचा व्यक्त केला विश्वास
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सज्ज झाले आहेत. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी हजारो कार्यकर्ते आणि समर्थक तेथे उपस्थित होते.
विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत ब्रम्हपुरी येथे मिरवणूक काढण्यात आली. नेवाजाबई हितकारिणी महाविद्यालयाच्या पटांगणावरून ही मिरवणूक निघाली. विविध वेशभूषा केलेले कार्यकर्ते, आदिवासींचे पारंपरिक वाद्ये, ढोल ताशे, गुरुदेव सेवा मंडळाची भजन पथक अशा सर्व आकर्षक बाबींचा समावेश या मिरवणुकीत होता. या मिरवणुकीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन वडेट्टीवार यांनी नामांकन अर्ज सादर केला. नामांकन रॅलीला मिळालेला प्रतिसाद बघता आपल्याला विजयापासून कुणी रोखू शकत नाही, असा विश्वास विजय वडेट्टीवार यावेळी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List