लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाचे मोठे यश
जम्मू काश्मिरच्या अखनूर भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सोमवारी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले आहे. सुरक्षा दलाचे हे मोठे यश आहे.
जम्मू काश्मिरच्या अखनूर भागात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सोमवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी अखनूर भागात कारवाई सुरू केली होती. या कारवाईदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. तसेच लष्कराची कारवाई अजूनही सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला चढवत अंदाधुंद गोळीबार केला होता. जोगवान परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा दलांतर्फे शोधमोहीम सुरू करण्यात आली. संपूर्ण परिसराला घेराव घातण्यात आला होता. यादरम्यान खौरच्या भट्टल भागात असन मंदिराजवळ सशस्त्र दहशतवादी लपल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांतर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच लष्कराकडून कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी झालेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्द्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List