तिरुपती मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस, प्रशासन अलर्टवर
अनेक विमान कंपन्यांना धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या मेल आल्यावर पोलीस आणि प्रशासन अलर्ट मोडवर आहे. हा मले कोणी आणि कोठून पाठवला, याचा तपास करण्यात येत आहे. याआधी दिल्ली आणि गुजरातमधील काही शाळांनाही ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यानंतर विमान कंपन्या आणि आता तिरुपती मंदिरालाही धमकी देण्यात आली आहे.
तिरुपती मंदिर बॉम्बस्फोट करत उडवून देण्याची धमकी ईमेलमार्फत देण्यात आली आहे. तिरुपतिच्या इस्कॉन मंदिराला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. रविवारी ईमेलद्वारे धमकी आली होती. याप्रकरणी मंदिर प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. इसिसचे दहशतवादी मंदिर बॉम्बने उडवून देतील, असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
धमकीचा ईमेल आल्याची माहिती मिळताच तिरुपती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मंदिराची झडती घेतली. स्फोटकांचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. मात्र, मंदिर परिसरातून कोणतीही स्फोटकं किंवा अन्य कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही.
धमकीचा ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत तिरुपती मंदिराच्या ईमेलवर आलेला हा चौथा मेल आहे. यापूर्वीच्या ईमेलमध्येही मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलीस आणि प्रशासना अलर्टवर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List