राजधानी दिल्लीत दिवाळीपूर्वीच प्रदूषणाचा धूर; वाहनांच्या उत्सर्जनामुळे प्रदूषणात वाढ

राजधानी दिल्लीत दिवाळीपूर्वीच प्रदूषणाचा धूर; वाहनांच्या उत्सर्जनामुळे प्रदूषणात वाढ

दिवाळी सणापूर्वीच देशाची राजधानी दिल्लीत वायूप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या दूषित वातावरणांमुळे अनेकांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. अशातच रविवारी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकांने म्हणजेच AQI ने 400 अकांचा टप्पा गाठला आहे. शनिवारी AQI 356 वर नोंदवला गेला. त्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.

दरवषी दिवाळीनंतर तण जाळणे आणि फटाक्यांमुळे दिल्लीची हवा प्रदूषित होते. मात्र, यंदा दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता ढासळल्याने चिंता वाढली आहे. आनंद विहार परिसरातील AQI ने 400 चा टप्पा ओलांडला आहे. अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे देण्यात आली आहे. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये AQI 420 ची नोंद झाली आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुढील तीन दिवस अत्यंत खराब असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या वायूप्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे वाहनांमधून होणारे उत्सर्जन आहे, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे देण्यात आली आहे. या प्रदूषणामुळे हवेतील लहान लहान विषाणूंचा शरिरावर खोलवर परिणाम होऊ लागला आहे. ज्यामुळे दमा, ब्राँकायटिस आणि इतर रोगांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

दिल्लीच्या प्रदूषणात वाहनांच्या उत्सर्जनांमुळे प्रदूषणात 13 टक्के वाढ झाली. सेंटर फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटच्या निर्णय समर्थन प्रणालीद्वारे अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत वाहनांमुळे होणारे प्रदूषण हे दिल्लीत सर्वाधिक असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2016 मधील एका अहवालानुसार, 38 % प्रदूषण हे रस्त्यावरील धुळीमुळे, 20 % वाहनांमुळे, 12% घरगुती इंधन वापरामुळे आणि 11% औद्योगिक श्रेत्रातील वायूमुळे प्रदुषणात वाढ झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;