Photo – मुलतानी मातीची चोली अन् खादीचा लेहेंगा… सोनम कपूरने वेधले चाहत्यांचे लक्ष

Photo –  मुलतानी मातीची चोली अन् खादीचा लेहेंगा… सोनम कपूरने वेधले चाहत्यांचे लक्ष

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनमने ‘सावरीया’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पण लग्नानंतर बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर इंडस्ट्रीपासून दूर राहीली. मात्र तिच्या फॅशन सेन्समुळे ती कायम चर्चेत असते.सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. नवनवीन लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करत असते.

बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर सोनमने पारंपरिक पेहरावात फोटोशूट करून प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे.

सोनमने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला खादीचा लेहेंगा परिधान केला आहे. याशिवाय सोनमने कर्नाटकातील लाल माती आणि मुलतानी मातीपासून बनवलेली चोली परिधान केली आहे.

अभिनेत्रीने या ड्रेसला शोभेल असा मिनिमल मेकअप केला आहे. तसेच हेवी दागिने परिधान करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

सोमनच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून तिच्या फोटोंवर चाहत्य़ांच्या कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;