आम्हाला महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचय, त्यासाठी जनता आमच्या सोबत! शरद पवार यांचा ठाम विश्वास
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह समस्त पवार कुटुंबीय आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातील जनता प्रचंड मताधिक्याने युगेंद्र पवार यांना विजयी करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडून हे प्रश्न सोडवले गेले नाहीत. अलीकडच्या काळात पक्षफुटी, पक्षांची मोडतोड करणे, सत्तेसाठी नको ती तडजोड करणे, विचार आणि कार्यक्रमाशी तडजोड करणे, हे ज्या घटकांनी महाराष्ट्रात केलंय, त्यांच्याविषयी आम्ही जनतेसमोर जाऊन भूमिका मांडणार आहोत. जनतेला परिवर्तनासाठी तयार करण्याची आमची भूमिका आहे. मी मविआच्यावतीने महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की, महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करणारा, शेतकरी, महागाई, बेरोजगारी, कामगारांचे प्रश्न, दलित, आदिवासी, महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमची आघाडी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी जनतेला दिला.
फक्त बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा मी सतत घेतोय. जसं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास 48 जागांपैकी 31 लोकसभेच्या जागा मिळवून आम्हाला यश दिलं त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे मी आभारी आहे. त्यांना मी विश्वास देतो लोकसभेला तुम्ही जी कामगिरी केली त्याची नोंद आम्ही आमच्या अंत: करणात ठेवलेली आहे. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. मविआच्यावतीने आम्ही विधानसभेच्या सगळ्या जागा लढवतोय. तिन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करत आहोत. 95 टक्के जागांवर आमचं एकमत झाले आहे. काही मर्यादित जागांबाबत आमच्यात विचारविनिमय सुरु आहे, त्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत स्पष्टता येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीनंतर बहीण भावाची आठवण झाली
गेली चार वर्ष त्यांच्या हातात सत्ता होती. तेव्हा त्यांना बहिणींची आठवण झाली नाही. कालची लोकसभेची निवडणुक झाल्यावर बहिण भाऊ या सरळ्यांची आठवण झाली . त्यामुळे लोकांनी धडा शिकवाचा तो शिकवला. लोक हिच भूमिका उद्याच्या निवडणुकीत घेतील. असे यावेळी शरद पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List