महाराष्ट्राच्या तरुणाईचा अपमान चालणार नाही! जाहितीद्वारे काँग्रेसची महायुतीला चपराक

महाराष्ट्राच्या तरुणाईचा अपमान चालणार नाही! जाहितीद्वारे काँग्रेसची महायुतीला चपराक

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी वाढत आहे. राज्यातून अनेक उद्योग राज्याबाहेर गेले आहेत. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. अनेक उद्योग बाहेरच्या राज्यात गेल्याने राज्यातील तरुणांचा रोजगार हिरावला गेला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसने जाहिरातीव्दारे महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. आता यापुढे महाराष्ट्राच्या तरुणाईचा अपमान चालणार नाही! काँग्रेसचा हात देणार आपल्याला साथ असे म्हणत महायुती सरकारला चांगलेच फटकाले आहे. सोशल मिडीयावर या जाहितीची चर्चा होत असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेसने महायुती सरकारच्या विरोधात “आता चालणार नाही” अशी जाहिरात अभियान सुरू केली आहे. गुजरातमध्ये टाटा एअरबस प्रकल्पाचा उद्घाटन होत असताना, महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर एक प्रभावी जाहिरात सादर केली आहे. त्यात भाजपने महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातकडे वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हा प्रकल्प सुरुवातीला महाराष्ट्रासाठी प्रस्तावित होता, परंतु दिल्ली सरकारला मान देत महायुती सरकारने महाराष्ट्राच्या हक्कावर गदा आणून तो प्रकल्प गुजरातला देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात 62 लाखांहून अधिक युवक बेरोजगार असताना, महत्त्वाचे प्रकल्प गमावल्यामुळे रोजगार संधीवर किती गंभीर परिणाम झाला आहे, हे या जाहिरातीद्वारे अधोरेखित करण्यात आले आहे.

महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राला सुमारे 7.5 लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे नुकसान झाले आणि 5 लाख संभाव्य रोजगार गमवावे लागले आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली आहे. काँग्रेसने अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आणखी जाहिरातींच्या मालिकेद्वारे हे मुद्दे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्राला गुजरातच्या फायद्यासाठी बाजूला सारणे योग्य नाही, असा संदशही काँग्रेसने दिला आहे. निवडणुकांची रणधुमाळी वाढली असताना या जाहिरातीसह अनेक जाहिरात मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;