हिंमत असेल तर चोरांना, लंफग्यांना दिलेले शिवसेनेचे चिन्ह गोठवा आणि मैदानात उतरा; संजय राऊत यांचे आव्हान
मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीलाही शक्तीप्रदर्शन करावे लागते, यातच त्यांची भीती स्पष्ट दिसून येत आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांना चांगलेच फटकारले. तसेच हिंमत असेल तर चोरांना आणि लंफग्यांना दिलेले शिवसेनेचे चिन्ह गोठवा आणि मैदानात उतरा,असे थेट आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
महायुतीत तीनपेक्षा जास्त चेहरे आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा त्यात नसून इतरांचे चेहरे आहेत. भाजपवाले नेपाळ, म्यानमार, श्रीलंकाही जिंकू शकतात. ज्यांच्या हातात प्रचंड पैसा आणि त्यांच्या हातात ईव्हीएमची सुत्रे आहेत. ते कोठेही जिंकू शकतात. आपल्या छातीवर आणि मुलांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांनी हरयाणा कसे जिंकले, ते सांगावे. महाराष्ट्रात ते कोणत्या पद्धतीने लढत आहेत, तेदेखील त्यांनी सांगावे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडत त्यांनी सत्ता मिळवली. फोडा, झोडा राज्य करा, ही त्यांची भूमिका आहे. त्यांच्यात लढण्याची हिंमत असेल तर सर्वात आधी त्यांनी चोरांना आणि लंफग्यांना दिलेले शिवसेनेचं चिन्ह गोठवावे आणि मैदानात उतरावे, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
काँग्रेसला त्यांच्या पक्षाच्या त्यांचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करतील, ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरे यांचा आहे. कुटुंबप्रमुख म्हणून जनता त्यांच्याकडे प्रेमाने आणि आदराने बघते, हे सांगण्यासाठी आम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाने त्यांचा चेहरा ठरवावा. एकनाथ शिंदे हे पुढील मुखअयमंत्रआ असणार नाही, अशी आपली खात्री आहे. हा निर्णय अमित शहा यांनीच घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत अर्ज भरावा असे संकेत आहेत. मात्र, सर्व सरकारी यंत्रणांचा वापर होत आहे. मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीलाही शक्तीप्रदर्शन करावे लागते, यातच त्यांची भीती स्पष्ट दिसून येत आहे. आमचे केदार दिघे सक्षम आहेत. त्यांना जनतेचा पाठिंबा आहे, हे निकालानंतर स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List