फोडा, झोडा राज्य करा, अशी भूमिका असणाऱ्यांचा महाराष्ट्रात पराभव निश्चित; संजय राऊत यांनी ठणकावले
महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यातील चर्चा झाल्या आहेत. काही संभ्रम असल्यास एकत्र बसून ते सोडवण्यात येतील. महाविकास आघाडीत बंडखोरीची लोगाण होऊ नये, यासाठी तिन्ही पक्ष एकत्र बसून मार्ग काढू, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रीय गृहमंत्री फोडा ,झोडा या भूमिकेत आहेत. त्यांनी त्यांचे कर्तव्य करत जम्मू कश्मीर, मणिपूरकडे लक्ष देत देशातील कायद सुव्यवस्था बळकट करावी, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केला.
अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. या काळात देशाची कायदासुव्यवस्था ढासळली आहे. जम्मू कश्मीर, मणीपूर याबाबात गृहमंत्री बोलत नाहीत. ते फक्त राजकारणाबाबत बोलतात. येथे निवडणुका जिंकलो, तिथे लढवणार तिथेही जिंकणार, हा पक्ष फोडणार, तो पक्ष फोडणार हे गृहमंत्र्यांचे काम आहे काय, असा सावलाही संजय राऊत यांनी केला. अमित शहा त्यांचे कर्तव्. करतक नाही. जम्मू कश्मीर, मणीपूर येथे त्यांनी जावे, परिस्थिती नियंत्रणात आणावी. ते महाराष्ट्र कधीही जिंकू शकणार नाही. पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह चोरायाचे, सत्तेसाठी कोणालाही सोबत घ्यायचे, ही त्यांची भूमिका आता जनतेला समजली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात विजय मिळणार नाही असेही त्यांनी ठणकावले.
दिग्रजच्या जागेबाबत आमच्यात आणि काँग्रेसमध्येच चर्चा झाली आहे. आम्ही ती जागा माणिकराव ठाकरे यांच्यासाठी सोडली आहे. तिथे आमचा उमेदवार लढणार नाही. दिग्रजच्या बदल्यात दर्यापूर हा मतदारसंघ काँग्रेसने आम्हाला दिला आहे. त्यामुळे त्यात वाद नाही. भूम परांडा जागेबाबतही आमच्यात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वाद नाही. त्याबाबत थोडा संभ्रम झाला आहे. ही जागा बदलण्याबाबत चर्चा झाली होती. याबाबत तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. मिरजमध्ये काँग्रेसचा उमेदवार देण्याची चर्चा सुरू आहे. असे झाले तर महाराष्ट्रात ही लागण लागेल आणि महाविकास आघाडीसमोरील अडचणी वाढतील. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करू आणि यातून मार्ग काढू. आता फार चर्चा होणार नाही. आता चर्चा संपलेल्या आहेत. मुंबईत एखादी आणखी जागा मिळावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. मात्र, मुंबईतील आमचे जागावाटप पूर्ण झाले आहे. मुंबईत सर्वात कमी जागा शरद पवार यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत. मात्र, त्यांनी समजुतीने भूमिका घेत त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मराठवाडा येथे जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई हा परंपरेप्रमाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेना जिंकणे गरजेचे आहे. विदर्भात काँग्रेस जिंकणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आम्ही अनेक तास बसून चर्चा करत जागावाटप केले. मात्र, काही जागांवर शेवटपर्यंत एकमत होत नाही, हेदेखील वास्तव आहे, असे त्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List