मिंध्यांचे उमेदवार थोरवेंनी गर्दी जमवण्यासाठी साड्या वाटल्या; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

मिंध्यांचे उमेदवार थोरवेंनी गर्दी जमवण्यासाठी साड्या वाटल्या; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

सत्ता आणि पैशांच्या जोरावर मिंध्यांचे कर्जतमधील उमेदवार महेंद्र थोरवे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इतका आटापिटा करूनही गर्दी जमेल की नाही, अशी भीती त्यांना आहे. त्यामुळे डोक्याला टेन्शन नको, काहीही करा, पण गर्दी जमवा, असे फर्मानच त्यांनी कार्यकर्त्यांना सोडले असून यासाठी हजारो महिलांना साड्या वाटण्याचा सपाटा लावला आहे. मिंध्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याविरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महाविकास आघाडीकडून निष्ठावंत शिवसैनिक नितीन सावंत मैदानात उतरले आहेत. खोक्यांसाठी थोरवेंनी केलेली गद्दारी कर्जत-खालापूरची जनता अजूनही विसरलेली नाही. त्यामुळे फोडाफोडीला विटलेले सुजाण मतदार मतदानाचीच वाट पाहात असून मिंध्यांना घडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. याचा धसका थोरवेंनी घेतला आहे.

29 ऑक्टोबर रोजी थोरवे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठी गर्दी जमवत शक्तिप्रदर्शन करण्याचा इरादा आहे. याकरिता त्यांनी कार्यकर्त्यांना हरप्रकारे माणसे जमवण्याचे फर्मान सोडले आहे. गावागावात जाऊन थोरवेंच्या नावाचे स्टिकर असलेल्या साड्या वाटल्या जात आहेत. याबाबत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचे निकटवर्तीय केतन बेलोसे यांनी प्रांत अधिकारी व निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;