पुणे शहर-जिल्ह्यात भाजपमध्ये नाराजीची खदखद

पुणे शहर-जिल्ह्यात भाजपमध्ये नाराजीची खदखद

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरासह जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. शहरातील सहा मतदारसंघांत भाजपने विद्यमान आमदारांनाच प्राधान्य देत इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले. त्यानंतर इच्छुकांकडून जाहीर नाराजीचे फटाके फुटले. थेट शहराध्यक्षांनीच घरचा आहेर दिल्याने भाजपची अंतर्गत टोकाची नाराजी दूर करणे भाजपसमोर आव्हान असणार आहे, अन्यथा त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहेत.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार माधुरी मिसाळ या तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यामुळे अॅन्टीइक्म्बन्सी निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपकडून पालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमालेदेखील पर्वतीमधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून त्यांना डावलण्यात आले. यामुळे भिमाले हे नाराज आहेत. यामुळे भिमाले यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देत दंड थोपटले. कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप शहराध्यक्षांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय, अशा शब्दांत घाटे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला. घाटे यांच्या पाठोपाठ कुणाल टिळक यांनीदेखील जाहीर नाराजी व्यक्त केली.

खडकवासलामध्ये पर्वतीप्रमाणे तीनवेळा निवडून आलेले भीमराव तापकीर यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. गेल्यावेळीस केवळ अडीच हजार मतांनी भाजपला विजय मिळवता आला होता. त्यामुळे येथील नाराज इच्छुक आणि अॅन्टीइक्म्बन्सीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

वडगावशेरी, हडपसरमध्येही नाराजी
वडगावशेरीतून जगदीश मुळीक यांचादेखील विचार केला गेला नाही, तर हडपसरमधून मिंधे गटालाही बेदखल केले गेले. त्यामुळे या दोन मतदारसंघातही महायुतीतील नाराजांची संख्या मोठी आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

मावळ, शिरूरमध्ये भाजपचे अस्तित्व संपले
शिरूर आणि मावळ हे भाजपचे परंपरागत मतदारसंघ मात्र या दोन्ही ठिकाणी अजित पवार गटाला उमेदवारी गेल्याने जिल्ह्यात भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. मावळमध्ये माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दिला, तर शिरूरमध्ये प्रदीप कंद यांनी भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेऊन नाराजी व्यक्त केली. जुन्नर भाजपमध्येही आशा बुचके यांनी निवडणुकीत उभे राहण्याची घोषणा केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;