आईची हत्या करून मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न, वरळी येथील घटना

आईची हत्या करून मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न, वरळी येथील घटना

आईची हत्या करून मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वरळी येथे घडली. मुलावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक केली जाणार आहे.

मृत महिला या वरळीच्या गांधीनगर येथील एका एसआरए इमारतीमध्ये राहत होत्या. तर त्यांचा मुलगा पेडर रोड येथे राहतो. कर्जावरून त्या दोघांचे वाद होत होते. शनिवारी तो महिलेच्या वरळी येथील घरी आला. तेव्हा त्यांच्यात कर्जावरून वाद झाला. वादानंतर त्याने महिलेच्या तोंडावर नॅपकीन ठेऊन तोंड आणि नाक दाबून तिची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने तीक्ष्ण हत्याराने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती स्थानिकांनी वरळी पोलिसांना दिली. त्यानंतर वरळी पोलीस घटनास्थळी आले. त्या दोघांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केले. तर महिलेच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. महिलेचा मुलगा हा त्याच्या पत्नीसोबत राहत होता. तो गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होता. त्यात त्याला कर्ज झाले होते. कर्जावरून त्या दोघांचा वाद सुरू होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;