शिवसेनेचा मिंध्यांना जोरदार झटका, बबनराव घोलप यांची घरवापसी

शिवसेनेचा मिंध्यांना जोरदार झटका, बबनराव घोलप यांची घरवापसी

शिवसेनेने आज मिंधे गटाला जोरदार झटका दिला. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मिंध्यांना रामराम करत शिवसेनेत घरवापसी केली. मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घोलप यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बबनराव घोलप आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बबनराव घोलप यांनी आज शिवसेनेत घरवापसी केली. त्यांचे स्वागत आहे. आता त्यांनी शिवसेनेची मशाल घरोघरी पोहोचवावी, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते.

शिवसेनेने बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अशा वेळी बबनराव घोलप यांनीही मिंधे गटाचा राजीनामा देऊन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. समाजासाठी आणि मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात आपण सरकारकडे मागणी केली होती. परंतु एकही मागणी पूर्ण झाली नाही, त्यामुळे समाज आपल्यावर नाराज झाला आहे, असे घोलप यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;