IND vs Nz कसोटी मालिका हरल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय, स्टार खेळाडूंनाही दिले आदेश

IND vs Nz कसोटी मालिका हरल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय, स्टार खेळाडूंनाही दिले आदेश

बंगळुरू व पुण्यातील कसोटी सामन्यांमध्ये अत्यंत लाजिरवाणे पराभव झाल्यामुळे बीसीसीआय सध्या टीम इंडियातील खेळाडूंवर नाराज आहे. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच टीम इंडियाने हिंदुस्थानात मालिका गमावली आहे. त्यामुळे बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत एक कठोर निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने खेळाडूंना दिवाळीत विश्रांती न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खेळाडूंसाठी दोन सराव सत्रेही आयोजित करण्यात आली असून स्टार खेळाडूंना देखील या सत्रांमध्ये सराव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बंगळुरूला पराभवाची झळ बसलेला हिंदुस्थानी संघ पुणे कसोटीत उसळी मारेल, अशी अपेक्षा कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे फोल ठरली. पुण्यात हिंदुस्थानी फलंदाज पेटून उठण्याऐवजी न्यूझीलंडच्या फिरकीसमोर त्यांचा अक्षरशः कोळसा झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;