Latur News – झोपण्याच्या जागेवरून क्षुल्लक वाद, दगडाने ठेचून एका व्यक्तीची निर्घृण हत्या

Latur News – झोपण्याच्या जागेवरून क्षुल्लक वाद, दगडाने ठेचून एका व्यक्तीची निर्घृण हत्या

आपल्या जागेवर झोपण्याच्या कारणातून झालेल्या वादातून भंगार गोळा करणाऱ्याने एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना लातूरमध्ये घडली. लक्ष्मण गजघाटे असे मयत व्यक्तीचे तर सचिन वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह जाळला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सचिन वाघमारे हा गेल्या 15 वर्षांपासून लातूर शहरात भंगार गोळा करण्याचे काम करतो. वाघमारे हा शनिवारी रात्री आपल्या नेहमीच्या जागेवर झोपला होता. यादरम्यान गजघाटे हा मध्यरात्रीच्या सुमारास तेथे आला. गजघाटेने वाघमारेला झोपेतून उठवले आणि स्वतः त्याच्या जागेवर झोपला. याच रागातून वाघमारे याने गजघाटेची दगडाने ठेचून हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह अंथरूणासह जाळला.

मयत लक्ष्मण गजघाटे हा मूळचा राहणारा नवी मुंबईतील आहे. उपचारासाठी तो लातूरला बहिणीकडे आला होता. मात्र गजघाटेला दारुचे व्यसन असल्याने त्याच्यावर योग्य उपचार करता येत नव्हते. शनिवारी दुपारी तो बहिणीला बाहेर जातो सांगून घरुन निघाला. मात्र रात्रीपर्यंत परतलाच नाही. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असता सदर घटना उघड झाली. घटनास्थळावरील घड्याळावरून मयताची ओळख पटवण्यात आली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;