“माझ्याकडे पाहून म्हणाले,तू सुंदर नाहीयेस”; बड्या प्रोडक्शन हाऊसकडून अपमान ते आज नावाजलेल्या मालिकेची ‘ती’ नायिका
मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीत किंवा मालिकांमध्ये आपलं नशीब आजमवायला अनेक मुले-मुली अगदी मोठ्या शहरांपासून ते छोट्या छोट्या गावांमधून येतात. त्यातील काही यशस्वी होतात तर काही काहींना रिकाम्या हाताने परतावं लागतं किंवा दुसऱ्या कोणत्यातरी क्षेत्रात हातपाय मारावे लागतात. पण बॉलीवूड असो किंवा टीव्हीचं जग कोणत्याही मुला-मुलीला घ्यायचं म्हटलं तर टॅलेंट पाहिलं जातं पण त्याहीआधी पाहिलं जातं ते त्यांचा रंग ,रुप, उंची, भाषा अशा अनेक गोष्टींवर ठरतं त्यांची निवड की रिजेक्शन.
पण काहीवेळेला ऑडिशनला आलेल्या या नवीन मुला-मुलींना रिजेक्शनसोबतच अपमानालाही बऱ्याचदा सामोरं जावं लागतं. सगळेच तो अपमान पचवू शकतात असं नाही. असाच एक अनुभव आला होता एका अभिनेत्रीला.
प्रसिद्ध अभिनेत्री आयशा सिंग हिच्यासोबत असंच काहीसं घडलं. 'गुम हैं किसी के प्यार में' या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेल्या आणि घराघरात पोहोचलेल्या आयशाला तिच्या संघर्षाच्या काळात मात्र बऱ्याच गोष्टींना सामोर जावं लागलं होतं, तिलाही अपमान आणि रिजेक्शनला सामोर जावं लागलं होतं.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये दरम्यान आयशाने तिच्या सोबत घडलेला किस्साही शेअर केला आहे, ती म्हणाली की," मी एका खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये गेले होते. माझ्याकडे बघून ते लोक म्हणाले की, 'तू सुंदर नाही आणि खूप मेकअप कर. नंतर आपण बोलू' तो मला मिळालेला पहिला नकार होता आणि ही माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं.'
सतत येत असलेल्या रिजेक्शनमुळे मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता.पुढे ती म्हणाली,''सुरुवातीला मी नशीबवान होते की मला काही जाहिराती मिळाल्या. पण मला जे करायचं होतं त्यासाठी मला बराच वेळ वाट पहावी लागली. जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा कुठे ऑडिशन्स होतात आणि कुठे जायचं हे तुम्हाला माहीत नसतं. या काळात बराच वेळ वाया जातो. असं नाही की तुम्ही कोणत्याही स्टुडिओ किंवा प्रॉडक्शन हाऊसमध्ये गेलात की तुम्हाला लगेच काम मिळतं. पण मला पहिला शो 'दिल्ली अरमानो की' मिळाला आणि त्यानंतर लगेचच दुसरा शोसुद्धा मिळाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List