महायुतीत धुसफूस! ‘या’ जिल्ह्यात अजित पवार गटाला एकही जागा मिळाली नाही

महायुतीत धुसफूस! ‘या’ जिल्ह्यात अजित पवार गटाला एकही जागा मिळाली नाही

महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड संघर्ष सुरू असून राज्यातील 16 हून अधिक विधानसभा मतदारसंघांत महायुतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. महायुतीत भाजपकडून मित्र पक्षांवर दबाव आणून जागा वाटपात स्वत:ला जास्त जागा घेतल्याची चर्चा आहे. जस जसा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येतोय व उमेदवाऱ्या जाहीर होत आहे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील रविवारी एक ट्विट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. त्यातील चार जागा भाजप लढवत असून एक जागा मिंधे गट लढवत आहे. अजित पवार गटाला या जिल्ह्यात एकही जागा न मिळाल्याने अमोल मिटकरी नाराज असून त्यांनी जाहीर पणे ट्विटरवरून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

”अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी  4 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला सुटली. मी स्वत: जिल्ह्यात चार वर्ष प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढीसाठी तीन जागेची मागणी केली मात्र एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी आहे”, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

या ठिकाणी टेन्शन

– कोथरूडमध्ये भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे, पण तेथे भाजपचेच अमोल बालवडकर यांनी बंडखोरी केली आहे.

– मावळात भाजपचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. तेथे भाजपच्या बाळा भेगडे आणि त्यांच्या समर्थकांनी राजीनामे देत राष्ट्रवादीच्या बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

– सोलापूर शहर उत्तरमधून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

– चंदगड-आजरा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश पाटील यांना अजित पवार पक्षाची उमेदवारी दिली आहे. तेथे भाजपचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली आहे.

– भाजपने नाशिक पश्चिममधून आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्याने तेथे भाजप नेत्यांनी बंडखोरी करत मनसेत प्रवेश करून उमेदवारी घेतली.

– दिंडोरीत विद्यमान आमदार नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असून, तेथे शिंदे गटाचे धनराज महाले यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला.

– बीडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;