Maharashtra Election 2024 – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Maharashtra Election 2024 – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण नऊ उमेदवारांची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. विधानसभा मतदार संघ 35 करंजा येथून ज्ञायक पटणी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मतदार संघ 46 हिंगणघाट मधून अतुल वांदिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच हिंगणा मधून रमेश बंग, अणुशक्तीनगर मधून फहाद अहमद, चिंचवड मधून राहुल कलाटे, भोसरीमधून अजित गव्हाणे, माझलगाव मधून मोहन बाजीराव जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच परळीतून राजेसाहेब देशमुख आणि माहोळमधून सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

1. करंजा (35) – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट (46) – अतुल वांदिले
3. हिंगणा (50) – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर (172) – फहाद अहमद
5. चिंचवड (205) – राहुल कलाटे
6. भोसरी (207) – अजित गव्हाणे
7. माझलगाव (229) – मोहन बाजीराव जगताप
8. परळी (233) – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ (247) – सिद्धी रमेश कदम

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून आता तीसरी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 76 उमेदवारांची नावे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;