‘नाम बडे और लक्षण छोटे’…BMW गाडीतून उतरली अन् कुंडी चोरून पळाली…

‘नाम बडे और लक्षण छोटे’…BMW गाडीतून उतरली अन् कुंडी चोरून पळाली…

नोएडामध्ये एका महिलेच्या अनोख्या चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या महिलेने बीएमडब्ल्यूमधून उतरून दुकानाबाहेरील कुंडीची चोरी केली आहे. दुकानाबाहेर ठेवलेली कुंडी चोरत असताना तिला काही लोकांनी अडवले तेव्हा तिने त्यांना आश्चर्यकारक उत्तरे दिले. दरम्यान ही चोरी दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नोएडाच्या सेक्टर 18 मधील आहे. एक महिला बीएमडब्लूची आलीशान कार घेऊन आली आणि एका दुकानासमोर थांबली. कार मधून उतरून या महिलेने दुकानाबाहेर ठेवलेलाी कुंडी चोरी केली आणि आपल्या गाडीत नेऊन ठेवली आणि गाडी घेऊन निघाली.

यावेळी आजूबाजूच्या लोकांनी महिलेला कुंडीची चोरी करत असताना पाहिले. त्यामुळे ते महिलेला जाब विचारण्यासाठी पुढे आले. त्यांनी महिलेला चोरी करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी रोज इथल्या कुंड्या उचलून घेऊन जाईन असे अजब उत्तर महिलेने तेथील लोकांना दिले. महिलेचे उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या महिलेने आतापर्यंत दोन कुंड्या चोरल्याचीही माहिती समोर येत आहे.

अनोख्या चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;