थिएटरमध्ये राडा; महिलेला राग अनावर, धावत आली अन् अभिनेत्याच्या थेट कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

थिएटरमध्ये राडा; महिलेला राग अनावर, धावत आली अन् अभिनेत्याच्या थेट कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल

कलाकारांनी त्यांच्या अभिनयाची पावती ही कायम प्रेक्षकांकडून मिळत असते. मग ती सकारात्मक भूमिका असो किंवा नकारात्मक. जोपर्यंत कलाकारांना प्रेक्षकांकडून काही प्रतिसाद, प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत त्यांची भूमिका ही चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे हे समजत नाही. कित्येकदा कलाकांचा अभिनय इतका खरा वाटणारा असतो की प्रेक्षकांना ते खरं भासू लागतं. जास्त करून चित्रपट आणि मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची अभिनय इतका खरा वाटतो की प्रेक्षक खरोखरच त्यांना व्हिलन समजायला लागतात आणि तशा प्रतिक्रियाही देतात. पण कलाकारांसाठी त्या नकारात्मक प्रतिक्रिया म्हणजे खरं तर त्यांच्या अभिनयाला मिळालेली दाद असते, आणि हे कलाकारसुद्धा जाणून असतात. त्यामुळे त्यांची भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेय याबद्दल त्यांनाही समाधानच वाटतं.

पण जर पडद्यावरील खलनायक किंवा खलनायिकेची भूमिका करणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांकडून शब्दांचा मार बसण्याऐवजी खरोखरचा मार खायला लागला तर ती भूमिका करण्याचे पडसादही लक्षात येतात. हो, असचं खरचं घडलं आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थिएटरमध्ये गेलेल्या एका अभिनेत्याला त्याची खलनायकाची भूमिका पाहून मार खाण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे.

NT Ramaswamy

NT Ramaswamy

चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून थिएटरमध्ये चित्रपट सुरु असताना अचानक थिएटरमध्ये जाऊन आपल्या चाहत्यांना सरप्राइज देणं कलाकारांना आवडतं किंवा हल्ली बरेच कलाकार असेच करतात. जेणेकरून चित्रपटाचे प्रमोशनही होते आणि प्रेक्षकांकडून प्रत्यक्षात चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रियाही समजतात. मात्र असचं चाहत्यांना सिनेमा चालू असताना सरप्राइज देणं एका दाक्षिणात्य अभिनेत्याला मात्र महागात पडलं आहे. चाहत्यांना सरप्राइज द्यायला आलेल्या एका तेलुगु अभिनेत्याला प्रेक्षक महिलेकडून मार खावा लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अभिनेत्याची कॉलर पकडत थेट कानशिलात लगावली

या व्हिडिओत सिनेमात सुरू असल्याचं दिसत आहे. त्यानंतर अचानक सिनेमातील कलाकार चाहत्यांना सरप्राइज द्यायला थिएटरमध्ये येतात. तेवढ्यात प्रेक्षकांमधील एक महिला कलाकारांजवळ धावत येत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्याची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे . हैदराबादमधील एका थिएटरमध्ये हा प्रकार घडला आहे. तेलुगु अभिनेता रामास्वामी यांच्याबरोबर ही घटना घडली आहे.

NT Ramaswamy

NT Ramaswamy

तेलुगू अभिनेता एनटी रामास्वामी यांच्यासोबत हैदराबादमध्ये ‘लव्ह रेड्डी’ या त्यांच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका थिएटरमध्ये त्यांच्या सहकलाकारांसोबत गेले होते. चित्रपटात एनटी रामास्वामी यांनी खलनायकायच्या भूमिकेत दिसले. त्यांची ही चित्रपटातील खलनायिकेची भूमिका पाहून थिएटरमध्ये एका महिलेला तिचा राग अनावर झाला आणि तिने धावत येत अभिनेत्याची कॉलर पकडली अन् कानशिलात लगावली. हे पाहून थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला.

अभिनेत्याची भूमिका पाहून महिलेला राग अनावर

‘लव्ह रेड्डी’ चित्रपट रामास्वामी हा प्रेम करणाऱ्या जोडप्यामध्ये येताना दाखवले आहे. तसेच एका सीनमध्ये अभिनेत्याने आपल्या ऑन-स्क्रीन मुलीवर दगडफेक केली आणि तिला सोडून दिले. हे चित्र पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेली एक महिला रामास्वामीच्या चारित्र्यावर प्रचंड संतापली. या महिलेन धावत येत अभिनेत्याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर ती अनेकदा त्यांच्या अंगावार धावूनसुद्धा येत होती. . तिला थांबवण्यासाठी अनेक कलाकारही पुढे आले होते. तसेच काही प्रेक्षकांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला की हा फक्त सिनेमा आहे. . मात्र या महिलेने थिएटरमध्ये खूप आरडाओरडा केला.

दरम्यान, या राड्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिलेला बाहेर काढलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच यावर अनेक कमेंट्सही येत आहे. एका युजरने लिहिलं की, “चित्रपटात एवढंही गुंतू नये.” स्मरण रेड्डी दिग्दर्शित हा सिनेमा असून ‘लव्ह रेड्डी’ ही एक अनोखी प्रेमकथा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;