मी काहीही करू शकत होती पण…, अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चा, अभिनेत्रीने सोडलं मौन

मी काहीही करू शकत होती पण…, अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चा, अभिनेत्रीने सोडलं मौन

Abhishek Bachchan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री निम्रत कौर (Nimrat Kaur) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. निम्रत हिच्यामुळेच अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये वाद सुरु आहेत… अशा चर्चांनी देखील जोर धरला आहे. रंगणाऱ्या चर्चांवर अभिषेक – ऐश्वर्या यांनी मौन बाळगलं आहे. पण अभिनेत्री निम्रत हिने पहिल्यांदा रंगणाऱ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त निम्रत हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत निम्रत हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत रंगणाऱ्या नात्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मी काहीही करू शकत होती… पण तरी देखील लोकं तेच बोलतील जे त्यांना बोलायचं आहे… अशा चर्चांना थांबवणं शक्य नाही… मला माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायला आवडतं…’ असं अभिनेत्री म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nimrat Kaur (@nimratofficial)

 

अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दसवी’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात निम्रत हिने अभिषेक याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. आता दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

निम्रत कौर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘एयरलिफ्ट’ सिनेमामुळे निम्रत हिच्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीच्या ‘लंचबॉक्स’ सिनेमाला चाहत्यांना डोक्यावर घेतलं. निम्रत हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. आता निम्रत लवकरच ‘सेक्शन 84’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची शुटिंग देखील पूर्ण झाली आहे.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन

 

 

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक ठिकाणी देखील ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत दिसते. तर अभिषेक कुटुंबासोबत दिसतो. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;