Salman Khan: काळवीटच्या शिकारीनंतर सलमान खानने कोरे चेकबूक ठेवले…आमचे रक्त सळसळत होते…लॉरेन्श बिश्नाईच्या चुलत्याचा मोठा दावा

Salman Khan: काळवीटच्या शिकारीनंतर सलमान खानने कोरे चेकबूक ठेवले…आमचे रक्त सळसळत होते…लॉरेन्श बिश्नाईच्या चुलत्याचा मोठा दावा

Salman Khan Lawrence Bishnoi Blackbuck Controversy: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत लॉरेन्स गँग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सलमान खान यालासुद्धा धमक्या मिळत आहेत. सलमान खान याने 1998 मध्ये ‘हम साथ-साथ है’ चित्रपटाच्या चित्रणीकरणादरम्यान कळवीटची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कळवीटला पूजनीय मानणारा बिश्नोई समाज सलमान खानवर प्रचंड नाराज आहे. या प्रकरणात सलमान खानला तुरुंगात जावे लागले होते. सलमान खानला या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईकडून हत्येची धमकी मिळत आहे. त्यामुळे सलमान याचे वडील सलीन खान यांनी सलमानने शिकार केली नाही, तो माफी मागणार नाही, असे म्हटले आहे. त्यावर लॉरेन्स बिश्नोई याचे चुलते रमेश बिश्नोई यांनी मोठा दावा केला आहे. सलमान खान कोरे चेकबुक घेऊन आला होता, असा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले रमेश बिश्नाई

रमेश बिश्नाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, काळवीटच्या शिकारीनंतर हे प्रकरण प्रचंड गाजले होते. बिश्नाई समाज संतप्त होता. ही सर्व परिस्थिती पाहून सलमान खान कोरे चेकबुक घेऊन आला होता. सलमान खान याने भरपाई म्हणून पैसे देण्याची तयारी दर्शवली होती. ब्लॅक चेकमध्ये हवी ती रक्कम भरण्याची तयारी त्याने दर्शवली होती. पुढे रमेश बिश्नाई म्हणतात, आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही त्यावेळी मोठी रक्कम घेऊन शांत बसलो असतो.

लॉरेन्सकडे 110 एकर जमीन

सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी लॉरेन्स बिश्नोई गँग पैसांसाठी सलमान खानला धमक्या देत असल्याचे म्हटले होते. त्यावर रमेश बिश्नोई यांनी सांगितले, आम्हाला आमची विचारधारा सर्वात महत्वाची आहे. त्याच्यापुढे पैसे काहीच नाही. सलमान जेव्हा कोरा चेक देत होता, तेव्हा आमचे रक्त सळसळत होते. लॉरेन्स बिश्नाई स्वत: गर्भश्रीमंत आहे. त्याच्याकडे 110 एकर जमीन आहे. त्याला कोणाच्याही पैशांची गरज नाही.

लॉरेन्स बिश्नोई गँगबाबत राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) खूप सक्रिय आहे. एनआयएने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईवर पकडण्यासाठी जाळे घट्ट केले आहे. अनमोल बिश्नोईबद्दल माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे एनआयएने म्हटले आहे. अनमोल बिश्नोईला ‘भानू’ नावाने ओळखले जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;