CID Promo: नव्या ट्विस्टसह परतणार CID, अभिजीतने दयाला का मारलं? प्रोमो पाहून चाहते थक्क

CID Promo: नव्या ट्विस्टसह परतणार CID, अभिजीतने दयाला का मारलं? प्रोमो पाहून चाहते थक्क

CID Promo: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय शो ‘सीआयडी’ पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल 6 वर्षांनंतर सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हीजनवर शो नव्या ट्विस्टसह पाहाता योणार आहे. यंदाच्या भागात शोमध्ये फार काही नवीन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सांगायचं झालं तर, पहिल्यांदा 1998 मध्ये शोचा पहिला एपिसोड स्ट्रिम झाला होता. त्यानंतर 20 वर्ष ‘सीआयडी’ने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अचानक निर्मात्यांनी शो बंद करण्याचा निर्णय घेतला.

20 वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य केल्यानंतर शो पुन्हा नव्याने सुरु होत आहे. शोचा प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनी टीव्हीने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रोमो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मित्रच मित्रावर गोळ्या झाडताना दिसत आहे. प्रोमोमध्ये अनेक वर्षांची मैत्री विसरत अभिजीत याने दया याला गोळ्या झाडल्या.

 

 

दोघांमध्ये होत असलेले वाद पाहता एसीपी प्रद्युमन दोघांचे वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात पण तेवढ्या अभिजीत याने चालवलेल्या गोळीतून दयाची हत्या होते. आता अभिजीतने दयाला का मारलं? हे रहस्य शो ऑनएयर झाल्यावर कळेल. प्रोमोवर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

‘सीआयडी’ कधी सुरु होणार याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. पण शोचा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सांगायचं झालं तर, ‘सीआयडी’ बंद होवून अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही शोचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

पूर्वी रात्री 10 वाजता शो प्रेक्षकांच्या भेटीला यायचा. त्यानंतर शोच्या वेळेमध्ये काही बदल करण्यात आले आणि शो 10.30 मिनिटांनी प्रदर्शित होऊ लागला. त्यानंतर 10.45 मिनिटांनी… याच कारणामुळे शोचा प्रेक्षकवर्ग कमी  झाला आणि शो ऑफएयर गेला.. असं देखील सांगण्यात आलं. पण आता शो नव्याने चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील शोच्या प्रतीक्षेत आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;