भाजपने द्वेषाच्या मर्यादा ओलांडल्यात, सातत्याने केजरीवालांना मारण्याचा होतोय प्रयत्न; आपचा खळबळजनक दावा

भाजपने द्वेषाच्या मर्यादा ओलांडल्यात, सातत्याने केजरीवालांना मारण्याचा होतोय प्रयत्न; आपचा खळबळजनक दावा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान हल्ला झाला होता. या घटनेनंतर आपने भाजपवर हल्ला चढवला आहे. आता भाजपने द्वेषाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भाजप अरविंद केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही, हे त्यांना समजले आहे. त्यामुळे केजरीवाल यांना ठार मारण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे, असा खळबळजनक दावा आपने केला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी हा आरोप करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पश्चिम दिल्लीतील विकासपुरी येथे पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात याला. भाजपने पाठवलेल्या गुंडांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप संजय सिंह यांनीही भाजपवर निशाणा साधला. तुमच्यात नेमका द्वेष तरी किती आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. कितीही द्वेष असला तरी तुम्ही केजरीवाल यांना हरवू शकत नाही. म्हणूनच तुम्ही त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहात, असे संजय सिंह म्हणाले.

अरविंद केजरिवालांवर झालेल्या या हल्ल्यात अमित शहा यांच्या गृहखात्याचा आणि पोलिसांचा हात आहे. पोलिसांसमोर हा हल्ला झाला, त्यामुळे कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. सुरक्षेतील ही चूक कशी झाली? असा प्रश्न यावेळी संजय सिंह यांनी उपस्थित केला. अरविंद केजरीवाल कुठेही गेले तरी ते हल्ला करतील. अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा प्रयत्न केला. जर केजरीवाल यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी भाजपच जबाबदार असेल, असेही संजय सिंह म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;