एक कप चहा 10 रूपये तर… वडापाव 15 रुपये, निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या प्रचारातील खाण्यापीण्याचे दरपत्रक ठरवले

एक कप चहा 10 रूपये तर… वडापाव 15 रुपये, निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या प्रचारातील खाण्यापीण्याचे दरपत्रक ठरवले

विधानसभा निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरु झाली असून प्रचाराचा नारळ फुटला आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर निवडणूक आयोगाचा वॉच असणार आहे. प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे दर निवडणुक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून चहासाठी 10 रुपये तर वडापावसाठी 15 रुपये असे दर ठरवण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा- नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्च देखील समाविष्ट आहे. उमेदवारांना हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागणार आहे. निवडणुक आयोगाने जारी केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिकचा खर्च करून आचारसंहितेचा भंग केल्यास उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.

प्रतिदिन आणि प्रतिमाणसी खर्च

चहा – 10 रुपये, कॉफी – 12 रुपये, नाष्टा – 38 रुपये, वडापाव – 15 रुपये, शाकाहारी जेवण – 110 रुपये, मांसाहारी जेवण- 140 रुपये, पुलाव – 75 रुपये, पुरी भाजी- 60 रुपये, पाणी जार (20 लिटर) – 80 रुपये.

प्रतिदिन हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च

नॉन एसी हॉटेल – 1650 रुपये, एसी हॉटेल- 3 हजार रुपये, फोर स्टार हॉटेल सूट- 20 हजार रुपये, फाईव्ह स्टार हॉटेल सूट- 50 हजार रुपये.

40 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मुभा

वाढती महागाई लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने उमेदवाराला 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 28 लाख होती.

सभेसाठी खर्च

प्लॅस्टिक खुर्ची प्रतिदिन- 10 रुपये, यु पिन बॉक्स- 6 रुपये, काडे पेटी- 1 रुपये, जनरेटर 125 केव्ही- 15 हजार रुपये प्रतिदिन, व्हीव्हीआयपी बुके- 1 हजार रुपये, व्हीआयपी पुष्पहार 12 फुटी डबल- 2 हजार रुपये, पार्टी झेंडा (एक फुट) प्रतिनग- 25 रुपये, पार्टी झेंडा (दोन फुट) प्रतिनग- 50 रुपये, टोपी प्रतिनग- 12 रुपये, स्कार्फ प्रतिनग- 10 रुपये, ढोल-ताशा पथक प्रति व्यक्ती – 1 हजार रुपये, बँड पथक- 1200 रुपये.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;