Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हरीशची गुन्हे शाखेच्या कोठडीत रवानगी, अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हरीशची गुन्हे शाखेच्या कोठडीत रवानगी, अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हरीश कुमारला 28 ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने शनिवारी दिले. तर उर्वरित आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सर्व आरोपींची 26 ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना मुंबईतील एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणी करताना न्यायालयाने आदेश दिले. शूटर गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

बाबा हत्ये प्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;