हैदराबादमध्ये ओव्हरटेकच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण सुटले, सरकारी बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

हैदराबादमध्ये ओव्हरटेकच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण सुटले, सरकारी बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

ओव्हरटेक करण्याच्या नादात सरकारी बसखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हैदराबादमध्ये घडली. करीमनगर-मेहदीपट्टणम मार्गावर ही घटना घडली. याप्रकरणी शमीरपेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. शेख सकलेन असे मयत तरुणाचे नाव आहे.

करीमनगर जिल्ह्यातील कारखाना गड्डा येथील रहिवासी शेख सकलेन आणि मोहम्मद फुरकान हे दोघे बाईकने करीमनगर-मेहदीपट्टणम मार्गावरून चालले होते. यादरम्यान पुढे चाललेल्या सरकारी बसला दोघे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. याच प्रयत्नात बाईकवरील नियंत्रण सुटले आणि बाईक घसरल्याने बसच्या चाकाखाली येऊन सकलेनचा मृत्यू झाला.

सकलेनच्या मागे बसलेला मोहम्मद फुरकान हा अपघातात जखमी झाला. अपघातानंतर फुरकान घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;