X चा युजर्ससाठी दिवाळी बोनस! सबस्क्रिप्शन प्लॅन झाले स्वस्त

X चा युजर्ससाठी दिवाळी बोनस! सबस्क्रिप्शन प्लॅन झाले स्वस्त

सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X ने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या युजर्सना एक मोठी भेट दिली आहे. X ने केवळ 340 रुपयांना प्रीमियम प्लॅन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युजर्सना स्वस्त किंमतीत ब्लू टिक आणि एक्सची प्रीमियम मेंबरशिप मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, X ने दिलेल्या या दिवाळी ऑफरमध्ये 2 सबस्क्रिप्शन प्लॅनवर सवलत उपलब्ध आहे. यामध्ये प्रीमियम आणि प्रीमियम प्लस योजनांचा समावेश आहे. कंपनी X प्रीमियम प्लॅनवर 40 टक्के सूट देत आहे. त्यामुळे या मासिक प्लॅनची ​​किंमत 566 रुपयांवरून 340 रुपयांपर्यंत कमी होईल. त्याचदरम्यान जर तुम्हाला एक वर्षाचा प्लॅन घ्यायचा असेल तर, तुम्ही तो फक्त 4080 रुपयांमध्ये घेऊ शकता. दिवाळी ऑफर जाहीर करण्यापूर्वी हा प्लॅन 6800 रुपयांमध्ये उपलब्ध होता.

प्रीमियम प्लस या प्लॅनवरही युजर्सना 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रीमियम प्लस प्लॅन मिळवण्यासाठी यूजर्सला दर महिन्याला 680 रुपये द्यावे लागतील. मात्र, त्याची मूळ किंमत 1,133 रुपये आहे. तसेच वर्षभराचा प्लॅन हा 13, 600 रुपयांवरून 8, 160 रुपये करण्यात आला आहे. या प्लान अंतर्गत युजर्सना अनेक गोष्टींचा फायदा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तुमचे अकाऊंट जाहिरात मुक्त असेल. याशिवाय यूजर्सना यात अनेक नवीन फीचर्स देखील मिळतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;