घटस्फोटानंतर दुसऱ्या प्रेमाच्या शोधात ईशा देओल; म्हणाली, ‘विश्वास आणि प्रेम…’

घटस्फोटानंतर दुसऱ्या प्रेमाच्या शोधात ईशा देओल; म्हणाली, ‘विश्वास आणि प्रेम…’

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलही ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ईशा देओल हिने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केले आणि एका दशकाहून अधिक काळ लग्न झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघांचे मार्ग मोकळे झाले. खुद्द ईशाने घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर ईशा आई हेमा मालिनी आणि दोन मुलींसोबत राहते.

दरम्यान, घटस्फोटानंतर झालेल्या एका मुलाखतीत ईशाने प्रेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘प्रेम एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये वेळेनुसार वाढ होते. जन्म होताच लगेच प्रेम फक्त आई आणि बाळामध्ये असू शकतं. बाकी वेळेनुसार गोष्टी बदलत असतात. माझ्यासाठी विश्वास आणि प्रेम एकत्र चालणाऱ्या दोन गोष्टी आहेत.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

 

‘प्रेमात कोणती अपेक्षा नसायला हवी. निस्वार्थी भावनेने प्रेम करता आलं पाहिजे. समोरच्यावर तुम्ही जेवढं प्रेम करत आहात, ती व्यक्ती देखील तुमच्यावर तेवढंच प्रेम करेल ही भावना चुकीची आहे. असा विचार देखील करायला नको. प्रेमात अपेक्षा ठेवल्या नाहीत तर तुम्ही देखील आनंदी राहाल. प्रेम करायचं असेल तर कधीही निस्वर्थी भावनेने करा…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

 

‘मी देखील प्रेम केलं आहे. पण कोणत्या अपेक्षा ठेवल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही देखील प्रेम करा आणि कोणतीच अपेक्षा ठेवू नका… ही देखील एका चांगली भावना आहे.’ असं वक्तव्य ईशा हिने प्रेमाबद्दल केलं आहे.

ईशा देओलचा घटस्फोट

ईशा आणि भरत यांनी 6 फेब्रुवारी 2024 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. घटस्फोटानंतर ईशाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ईशा हिने अभिनय विश्वात देखील पुन्हा पदार्पण केलं आहे. ईशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;