सलमान खान – मलायका अरोरा यांचं कनेक्शन, सोहैलच्या पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा

सलमान खान – मलायका अरोरा यांचं कनेक्शन, सोहैलच्या पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा

Salman Khan – Malaika Arora: अभिनेता सलमान खान ज्यांच्यासोबत संबंध जोडतो, त्यांना कधीच चांगल्या – वाईट काळात एकटं सोडत नाही. सलमान कायम संकट काळात जवळच्या व्यक्तींच्या सोबत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर आहे. असं असताना देखील सलमान खान अनेकांच्या मदतीसाठी आणि कामासाठी पुढे असतो.

गेल्या महिन्यात अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. तेव्हा संपूर्ण खान कुटुंब मलायका हिच्यासोबत होतं. घटनेची माहिती मिळताच मलायकाचा पहिला पती अरबाज खान तिच्या आई – वडिलांच्या घरी पोहोचला. अरबाज नंतर वडील सलीम खान आणि आई सलमा खान, संपूर्ण कुटुंब मलायकाच्या घरी पोहोचलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

सलमान खान येणार नाही… अशी चर्चा रंगली होती. पण मध्यरात्री सलमान देखील मलायका हिच्या आई-वडिलांच्या घरी पोहोचला. सांगायचं झालं तर, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाल्यानंतर सलमानने अभिनेत्रीचं तोंड देखील पाहिलं नव्हतं. पण मलायका कठीण काळात सलमान धावून आला.

अनेक वर्षांनंतर सलमान – मलायका आमने – सामने आले तेव्हा दोघांमध्ये काय बोलणं झालं? हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता सोहैल खान याची पहिली पत्नी सीमा सजदेह हिने सलमान बद्दल मोठा खुलासा केला आहे. सीमाने सलमान आणि खान कुटुंबियांचं कौतुक केलं आहे.

सीमा म्हणाली, ‘सलमान खान कायन त्याच्या कुटुंबियांच्या पाठिशी उभा असतो. मलायकाला गरज होती तेव्हा देखील सलमान तिच्यासोबत होता. सलमान कुटुंबाची मजबूत भींत आहे. कोणीही संकटात असेल तेव्हा सलमान त्याठिकाणी पुढे असतो…’ असं देखील सीमा म्हणाली.

सीमा सजदेह ही सलमान खान याचा लहान भाई सोहैल खान याची पहिली पत्नी आहे. अनेक वर्ष एकत्र संसार केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोन मुलांच्या जन्मानंतर सोहैल आणि सीमा विभक्त झाले. पण आजही दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;